Wednesday 6 April 2016

कृषिसंगम 

कृषीसंगम होवो हा ज्ञानविज्ञानाचा
आजी माजी विद्यार्थी मैत्र ऐक्याचा

रूजवूया विचार कृषिविज्ञानाचा  
कृषिविज्ञाने मिळे वसा प्रगतीचा

संगम जुन्या आठवणीं उजळण्याचा 
जुन्या मैत्रीतले सप्तरंग जपण्याचा 

होस्टेलचे मनस्वी दिन आठवण्याचा 
काळ तोच उमेदीचा मने बहरण्याचा 

आदर करूयात ज्ञान तपस्येचा 
संशोधकांचा नि कृषि शास्त्रज्ञांचा 

मान राखूयात सकल गुरुजनांचा 
स्फूर्तिदायी तयांच्या शिकवणीचा

नित्य मार्गप्रदीप त्या अर्ध्वर्यूंच्या
आदर्शाचा अाणि कार्यकर्तृत्वाचा 

ध्यास घेऊया शेतीच्या भरभराटीचा 
अभ्यासाने कृषिवैभव फुलवण्याचा

डंका बळीराजाच्या सुखवैभवाचा 
चौमुलुखी कीर्ती अन समाधानाचा 

भातृभाव सदा मनोमनी जपण्याचा 
कृषिमित्रांना नित साह्य करण्याचा 

कृषिसंगम होवो उत्सव मनामनांचा
कृषि महाविद्यालयाच्या उत्साहाचा 

विजयग्रज

No comments:

Post a Comment